Home महाराष्ट्र मंत्रालयात आज बिनखात्याच्या मंत्र्यांची कॅबिनेट बैठक

मंत्रालयात आज बिनखात्याच्या मंत्र्यांची कॅबिनेट बैठक

मुंबई : महाविकास आघाडीचा शपथविधी होऊन आज 14 दिवस झाले तरीही खाते वाटप झाले नाहीत. त्यामुळए कॅबिनेट मंत्र्यांची अवस्था बिनखात्याचे मंत्री अशी आहे. कारण सर्व खाती आजून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः हाताळत आहेत. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये नाराजीचा सूरही उमटू लागला आहे.

मंत्रालयात आज कॅबिनेट बैठक होणार आहे. या बैठकीला बिनखात्याचे कॅबिनेट मंत्री उपस्थित राहतील. कॅबिनेट खात्यांचे वाटप काल रात्री उशिरा जाहीर केले जाणार होते. मात्र ते आजूनही केले गेलेच नाहीत.

काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात खातेवाटपाबाबत तोडगा निघाला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात खातेवाटपातील गाडी पुढे जात नसल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, आज तरी कॅबिनेट खात्याच्या मंत्र्यांना कॅबिनेट बैठकीपर्यंत खातेवाटप जाहीर होणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“इतर राज्यातील नेते ही म्हणत आहेत की ये हमारे यहा भी हो सकता है”

असदुद्दीन ओवेसी यांनी लोकसभेत फाडली विधेयकाची प्रत

” राज्यात सुरु केलेल्या योजना भाजपच्या भल्याच्या नाही तर राज्याच्या भल्याच्या”

रामदास आठवले मुर्ख आहेत, तळवे चाटूनच त्यांनी पदं मिळवलीत- आनंदराज आंबेडकर