Home पुणे शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली- रामदास आठवले

शिवसेना पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावाखाली- रामदास आठवले

पुणे : बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावणाऱ्या ‘उद्धव ठाकरे यांनी समर्थन केले पाहिजे. मात्र, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दबावामुळे ते भूमिका घेत नाहीत, असं म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

पुण्यातील शनिवार पेठेत आरपीआयच्या नव्या मध्यवर्ती कार्यालयाचे आणि कायदेशीर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते झालं. या वेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

‘सीएए’, ‘एनआरसी’बाबत देशातील मुस्लिमांना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, हा कायदा नागरिकत्व देणारा असून, हिरावणारा नाही,’ असंही अठवलेंनी म्हटलं आहे.

बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योग्य भूमिका घेतलेली असून, ते सीएए, एनआरसीच्या पाठिंब्यासाठीच अप्रत्यक्षपणे मोर्चा काढत आहेत, असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंचे अभिनंदन केलं.

महत्वाच्या घडामोडी-

महाराष्ट्रात NRC कायदा लागू होऊ देणार नाही- उद्धव ठाकरे

न्यूझीलंडला व्हाईटवॉश देत भारताने रचला इतिहास

“गांधीजींच्या नावाने छाती ठोकणारे पवार कोंबडी, मासे खाऊन गांधीजींची पुण्यतिथी साजरी करतात”

अर्थसंकल्पात महाराष्ट्राला मिळालेल्या कर निधीवर अजित पवार नाराज, म्हणतात…