मुंबई : दिल्ली विधासभा निवडणुकीचा निकाल समोर येत आहे. यात पराभव होत असल्याचं दिसताच भाजपनं आपली बाजू सावरण्याचं प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते वृत्तवाहिन्यांशी बोलत होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्याचा (सीएए) दिल्लीच्या निकालांशी काहीही संबंध नाही. शाहीन बाग हा या निवडणुकीतल्या अनेकांपैकी एक मुद्दा होता,’ असा दावा भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
मागील वेळी भाजपच्या 3 जागा होत्या. त्या आता 13 पर्यंत गेल्या आहेत. त्यामुळं अपेक्षित यश मिळालं नाही एवढंच म्हणता येईल,’ असं मुनगंटीवार म्हणाले.
दरम्यान, विकासकामावर लोकांनी मतं दिली असतील तर ‘आप’च्या जागा वाढायला हव्या होत्या, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
भाजपच्या अहंकाराचा दिल्लीकरांनी पराभव केला; शिवसेनेचे भजपवर टीकास्त्र
“दिल्लीच्या जनतेने भाजपला नाकारत देशद्रोही जाहीर केलं”
“ती आपल्यातून निघून गेली, पण तिच्या मारेकर्याला कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी”
त्या हरामखोराला जागेवरच ठार मारा; हिंगणघाट प्रकरणावर निलेश राणेंची संतप्त प्रतिक्रिया