मुंबई : ज्यांच्याकडे लपवण्यासारखं काही असतं, ते घाबरुन भाजपमध्ये प्रवेश करतात, पण आम्ही शिवसेनेत आहोत, शिवसेनेत राहणार आणि शिवसेनेतच मरणार, हे सरकार पाच वर्ष टिकणार, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ईडी ही सरकारी संस्था आहे. सरकारी कागदपत्रांकडे कानाडोळा करु शकत नाही, भले कायद्यावर कोणाचाही दबाव असला, तरी आम्ही कायदे मानतो. कायद्यांचं पालन करतो. मी अद्याप ईडीची नोटीस पाहिली नाही, त्याची मला गरजही वाटत नाही, असं संजय राऊत म्हणाले.
दरम्यान, मला धमकी देणारा अजून जन्माला यायचाय, जो मला धमकी देईल, तो राहणार नाही, असा इशाराही राऊतांनी दिला.
महत्वाच्या घडामोडी-
“नारायण राणेंना भाजपमध्ये कोण विचारतंय? राणेंना त्यांचाच पक्ष किंमत देत नाही”
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 8 विकेट्सनी विजय; मालिकेत 1-1 ने बरोबरी
जेव्हा काँग्रेस पक्ष करेल बंड, तेव्हा…; आठवलेंचा कविता करत ठाकरे सरकारवर निशाणा
केंद्रात आणि राज्यात भाजपच येणार, ठाकरे सरकार कोसळणार; नारायण राणेंकडून डेडलाईन जाहीर