नागपूर : सोमवारी पत्रकार परिषद राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ओबीसी आरक्षणाबद्दल भूमिका मांडली. यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नागपूरमध्ये माध्यमांशी बोलत होते.
ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारने ताट वाढलं, पण राज्य सरकारने ओबीसी समाजाचे हात बांधले, ओबीसी आरक्षणाचं केंद्र सरकारने समोर केलेलं ताट राज्य सरकारच हिसकावून घेत आहे, अशा शब्दात बावनकुळे यांनी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं आहे.
दरम्यान, घटना दुरुस्तीने राज्यांना आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा झाला असं अनेकांना वाटलं. खरंतर याबाबत अनेकांमध्ये गैरसमज निर्माण झाला आहे, असं सांगतानाच जेवणाचं निमंत्रण दिलं पण हात बांधला, असा हा प्रकार असून केंद्राने ओबीसींची शुद्ध फसवणूक केली, अशी टीका पवार यांनी केंद्र सरकारवर केली होती.
महत्वाच्या घडामोडी –
भारतीय वायुसेनेच्या विमानाने अफगाणिस्तानातून 120 भारतीय सुरक्षित परतले
“मोठी बातमी! गेल्या 4 दिवसांपासून खासदार उद्यनराजे भोसले रूग्णालयात, पुण्यात उपचार सुरू”
पवार साहेब, तुम्ही कधी तरी खरं बोलणार आहात का?; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सदाभाऊ खोतांचा सवाल
अमर अकबर अँथनी अशी यांची तीन दिशेला तीन तोंडं; रावसाहेब दानवेंचा टोला