आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पणजी : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. गोव्यातील भाजपच्या चार आमदारांनी राजीनामा दिला आहे. तसेच गोव्यात शिवसेनेला काँग्रेस साथ देत नसल्याचं दिसत आहे. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेस खूप हुशार पक्ष आहे. ते इथे सगळ्यांना सोबत घेतील पण शिवसेनेला सोबत घेणार नाही. महाराष्ट्रात ते शिवसेनेसोबत असतील पण त्यांना हे माहिती आहे की गोव्यात शिवसेनेला सोबत घेतल्यास आपल्या मायनॉरिटी बेसला धक्का बसेल. त्यामुळे ते शिवसेनेला सोबत घेणार नाहीत, असा दावा फडणवीसांनी यावेळी केला.
हे ही वाचा : गोव्यात काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढणार का?; शरद पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले…
दरम्यान, गोव्यात शिवसेनेची लढाई ही नोटासोबत असते. त्यांची लढाई ही अनामत एका जागेवर तरी रक्कम वाचवण्यासाठी असते. मला वाटत नाही की ते काही करु शकतील, असा टोलाही फडणवीसांनी यावेळी लगावला.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेसचा भाजपाला मोठा धक्का; ‘या’ मोठा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
भाजपचे 13 आमदार लवकरच पक्षाला रामराम करणार; शरद पवारांचा मोठा दावा