Home महाराष्ट्र “भाजपला मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की, पुन्हा ते निवडणूकच विसरले पाहिजेत”

“भाजपला मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की, पुन्हा ते निवडणूकच विसरले पाहिजेत”

औरंगाबाद : भाजपला मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की, पुन्हा ते पदवीधरांची निवडणूकच विसरले पाहिजे., असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. धनंजय मुंडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार सतिश चव्हाण यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्याच्या हक्काचे रोजगार आणि विधी विद्यापीठ विदर्भाला नेले. आज मात्र, ते मराठवाड्याची मते मागायला येत आहेत. त्यामुळे भाजपला या मराठवाड्याच्या मातीत असं गाडा की पुन्हा ते पदवीधरांची निवडणूकच विसरले पाहिजे, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, आज तुम्ही पदवीधरांसाठी मतं मागत आहात. पण आमचे उद्योग तुम्ही विदर्भाकडे का नेले? आमच्या हक्काचं जे जे होतं, ते विदर्भाला का दिलं? असा सवाल फडणवीस यांना विचारायला हवा होता., असंही धनंजय मुंडे म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

पंढरपूर तालुक्याचे कार्यकुशल व लोकाभिमुख नेतृत्व हरपले; भारत भालकेंच्या निधनानंतर शरद पवारांनी अर्पण केली श्रद्धांजली

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचं उपचारादरम्यान निधन

राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लाॅकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारचा निर्णय

महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल