आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
रत्नागिरी : भाजप खासदार सुजय विखे पाटील यांनी काल बोलताना महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली होती.
महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस नवऱ्याच्या, शिवसेना बायकोच्या तर काँग्रेस बिनबुलाये वऱ्हाडी असल्याचा टोला सुजय विखे पाटलांनी लगावला. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.
हे ही वाचा : “राष्ट्रवादीकडून भाजपला खिंडार, हर्षवर्धन पाटलांच्या कट्टर समर्थकासह ‘हा’ मोठा नेता हाती बांधणार घड्याळ”
‘नवरा, बायको, पाहुणे अशी बिरुदावली आमच्यातील सगळ्यांना देत आहेत. पण षंढांना काय बिरुदावली द्यायची, षंढ कुठल्याच भूमिकेत नसतात. त्यामुळे मी त्यांच्यावर जास्त बोलणार नाही’, असं म्हणत जयंत पाटलांनी स्मितहास्य करत टोला लगावला.
दरम्यान, ‘महाविकास आघाडीचा संसार असा आहे की, लग्न राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं आहे. त्यात राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूमिकेत आहे. कारण त्यांची मनमानी सुरु असते. शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत आहे, ती बिचारी काहीच बोलत नाही. तर काँग्रेस हे बिनबुलाये वऱ्हाडी आहेत, त्यांना कितीही बोललं तरी हे जेवणाचं ताट सोडायला तयार नाहीत, अशी टीका खासदार सुजय विखे पाटील यांनी काल केली होती.
महत्वाच्या घडामोडी –
काँग्रेस बाप आहे आणि बापच राहणार; नाना पटोलेंनी सुजय विखे पाटलांना सुनावलं
“शिवसेनेची मोठी खेळी, राष्ट्रवादीचे ‘ते’ 5 नेते आज शिवबंधन हाती बांधणार”
“शिवसेनेत जोरदार इनकमिंग, चंद्रपुर येथील शेकडो युवकांनी शिवबंधन हाती बांधत केला, युवासेनेत प्रवेश”