आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सोलापूर : अक्कलकोटमध्ये एक संतापजनक घटना घडली आहे. भर दुपारी घडलेल्या या घटनेनं अक्कलकोटमध्ये खळबळ उडाली आहे.
किरकोळ कारणांवरून झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून दोघा भावांना, हल्लेखोरांनी घरापासून फरफटत ओढत ग्रामपंचायत कार्यालयासमोर आणून झाडाला बांधलं आणि बेदम मारहाण केली.
हल्लेखोर एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांच्या घरातील एका महिलेलाही फरफटत आणून अक्षरशः विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना अक्कलकोट तालुक्यातील किणी गावात घडली. याप्रकरणी पोलिसांनी 21 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
ही बातमी पण वाचा : शरद पवार-अजित पवार भेटीवर, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….
मिळालेल्या माहितीनुसार, किनी गावात घराजवळ राहणा-या हल्लेखोरांच्या कुटुंबीयांतील एका तरूणाने दारूच्या नशेत पीडित महिलेला शिवीगाळ व दमदाटी केली होती. त्यावरून त्यांच्यामध्ये किरकोळ भांडण झाले होते. मात्र त्याचा राग मनात धरून हल्लेखोरांनी पीडित महिलेच्या घरावर हल्ला केला. यावेळी काही गावक-यांनी हल्ला रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु हल्लेखोरांनी दहशत निर्माण केली होती.
दरम्यान, यानंतर पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार गंगाधर देडे, बाबू देडे, शाम गंगाधर देडे, आबा देडे, अभिजित देडे, गिरीश देडे, यल्लव्वा देडे, धुळाबाई देडे, सत्यभामा देडे, रेखा किरण देडे, गजराबाई देडे, रेखा शाम देडे, प्रदीप देडे, संदीप देडे, मंगला देडे, उर्मिला देडे आदींची नावे आरोपी म्हणून निष्पन्न झाली आहेत. यापैकी 15 जणांना अटक करून अक्कलकोटच्या न्यायदंडाधिकारी बी. ए. गायकवाड यांच्यासमोर हजर केले असता त्या सर्वांना न्यायालयीन कोठाडीत पाठविण्यात आदेश देण्यात आला आहे.
महत्त्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला, अधिवेशनापूर्वीच मोठी घडामोड
मोठी बातमी! राष्ट्रवादीचे मंत्री शरद पवार यांच्या भेटीला, अधिवेशनापूर्वीच मोठी घडामोड
कृषीमंत्रीपद गेल्यानंतर मंत्री अब्दुल सत्तार यांची पहिली प्रत्रिक्रिया; म्हणाले…