सुपरस्टार अभिनेता रजनीकांतला हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यासंदर्भात अपोलो हॉस्पिटलने निवेदन जारी केलं आहे.
श्री. रजनीकांत यांना आज सकाळी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या 10 दिवसांपासून ते हैदराबादमध्ये एका चित्रपटाचे शूटिंग करत होते. सेटवर असलेल्या 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे रजनीकांत यांनी 22 डिसेंबर रोजी आपली कोरोना चाचणी केली असता त्यांचा अहवाल निगेटीव्ह आला., असं निवेदनात म्हटलं आहे.
तेव्हापासून, त्यांनी स्वत: ला आयसोलेट केलं. कोविड-19 ची कोणतेही लक्षण नसले तरी त्यांच्या ब्लड प्रेशरमध्ये तीव्र चढउतार दिसून आले आणि पुढील तपासणीची आवश्यकता आहे ज्यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केलं गेलं. त्यांचा रक्तदाब कमी होईपर्यंत त्यांच्यावर रुग्णालयात बारकाईने लक्ष ठेवले जाईल. रक्तदाब चढउतार आणि थकवा व्यतिरिक्त त्यांना इतर कोणतीही लक्षणे नाहीत., असंही निवेदनात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा; सिराज-गिल यांचं पदार्पण
नाईट कर्फ्युवरून केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…
“जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही”