आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : पुण्यात लोकांना गरज असलेली कामे होत असताना सत्ता आणि संघटन एकत्र काम करत आहेत. त्यामुळे शहरात जिथे जाईल तिथे भाजपचेच अस्तित्व असल्याचे नजरेस पडते. लोकांच्या मनामध्ये भाजपविषयी सकारात्मकतेची भावना निर्माण झाली आहे. त्यामुळे मागच्या महापालिका निवडणुकीतील रेकॉर्ड तोडून आपण त्यापेक्षा जास्त जागा जिंकू शकतो, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा : “भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळं मला तुरूंगात टाकलं; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा दावा”
‘मॅन टू मॅन’ आणि ‘हार्ट टू हार्ट’ म्हणजेच मतदारांशी थेट संपर्क साधणे हे भाजपचे पारंपरिक शक्तिस्थळ आहे. मतदारांपर्यंत केंद्र आणि महापालिकेच्या माध्यमातून केलेली विकासकामे आणि योजना पोहचवा. त्यासाठी अटलशक्ती महासंपर्क अभियान राबवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीदिनी २५ डिसेंबर रोजी शहर भाजपच्यावतीने अटलशक्ती महासंपर्क अभियान राबविण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. या अभियानाच्या प्रचारार्थ तयार करण्यात आलेल्या पुस्तकाचे प्रकाशन, बोधचिन्ह आणि पक्षाच्या ‘यूट्यूब’ चॅनलचे अनावरण फडणवीस यांच्या हस्ते सोमवार रोजी करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला.
महत्वाच्या घडामोडी –
“जैन मुनी पदम सागरजी महाराज ‘शिवतीर्थ’वर; राज ठाकरेंनी पुणे दाैरा अर्धवट सोडला”
शिवसेनेचे ठरलं; गोव्यात स्वबळावर, उत्तरप्रदेशात काँग्रेससोबत निवडणूक लढणार?