“बॉलिवूड अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण”

0
256

मुंबई : बॉलिवूड अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांना कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात हिमाचल प्रदेशच्या आरोग्य सचिवांनी माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सनी देओल हे मनालीतील आपल्या फार्महाऊसवर थांबले होते. सनी देओल यांना ताप आणि गळ्यामध्ये खवखव जाणवू लागली होती. त्यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केल्याने त्यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मनालीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित ठाकुर यांनी दिली आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमागे सनी देओल यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर ते आराम करण्यासाठी मनालीतील आपल्या फार्महाऊसवर थांबले होते.

महत्वाच्या घडामोडी-

अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ठग; मनसेचा योगी आदित्यनाथांना अप्रत्यक्ष टोला

तिघे एकत्र या नाहीतर चौघे या आम्ही एकटे पुरेसे आहोत- चंद्रकांत पाटील

नारायण राणेंच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी; विनायक राऊत यांची मागणी

कितीही ट्रोल करा, मी मराठी मुलगी आहे, मागे हटणार नाही- उर्मिला मातोंडकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here