आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : ‘येत्या 3 मे रोजी रमजान ईद आहे. माझी राज्य सरकार आणि गृह खात्याला विनंती आहे. आम्हांला कुठचीही दंगल, तेढ निर्माण करायचा नाही, महाराष्ट्राचं स्वास्थ बिघडवायचं नाही., असं राज ठाकरे म्हणाले. आज मनसेच्या ठाण्यातील मेळाव्यात ते बोलत होते.
आज 12 तारीख आज आहे. आजपासून 3 मेपर्यंत सगळ्या मस्जिदीच्या मौलावींशी बोलून घ्या, सर्व मस्जिदीवरील भोंगे उतरवायला सांगा. आमच्याकडून 3 तारखेनंतर तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही, असं म्हणत राज यांनी सरकारला आश्वासन दिलं.
हे ही वाचा : “शिवसेनेचा भाजपला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं शिवबंधन”
दरम्यान, या मस्जिदींच्या भोंग्याचा अख्ख्या देशाला त्रास होतोय, यात धार्मिक तेढ कुठे आहे? तुम्हाला अजान पडायची आहे, तर त्यांनी ती घरात पडावी. शहरातली रस्ते फूटपाथ कशाला अडवता? प्रार्थना तुमची आहे, ती आम्हाला कशाला ऐकवता? सांगून तुम्हाला समजत नसेल, तर तुमच्या मस्जिदीबाहेर आम्ही हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणारच, असं राज यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
ईडीच्या नोटीशीवर राज ठाकरेंनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाले…
“सुप्रिया सुळेंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत”
“केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या उंचीएवढा दुसरा नेता कोकणात नाही”