पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था झालीये- नाना पटोले

0
391

मुंबई : मंदिरं सुरू करण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या आंदोलनावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप सत्तेसाठी कासावीस झाली आहे. पाण्यातला मासा बाहेर पडल्यावर जसा तडफडतो, तशी भाजपची अवस्था झाली आहे, असा हल्लाबोल नाना पटोले यांनी केला. ते माध्यमांशी बोलत होते. तसेच सत्तेच्या बाहेर गेल्याने भाजप कासावीस झाली आहे.

दरम्यान, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी तर 15 ऑगस्टला मंत्रालयावर झेंडा फडकवणार असल्याची घोषणा केली होती. त्यांना सत्तेची लालसा किती मोठ्या प्रमाणावर आहे हे दिसून येतं. लोकं मेली तरी त्यांना त्याचं काही पडलेलं नाही, असंही नाना पटोले यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात”

ईडी लावली, तर सीडी काढेन; एकनाथ खडसेंकडून पुनरूच्चार

खाकी वेषातील दरोडेखोर परमवीर सिंग यांच्या मुसक्या आवळणंं गरजेचं- हसन मुश्रीफ

मुंबई महापालिका स्वबळावर जिंकली पाहिजे, कुणाची लाचारी आपल्याला नको- संजय राऊत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here