मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थेतील ओबीसी आरक्षणाची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सध्या राज्यात ओबीसींसाठी कोणतंच आरक्षण उरलेलं नाही, असं वक्तव्य विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोेले यांनी प्रतिक्रिया दिली.
आरक्षणाचा विरोध करणारी व्यवस्था जी देश पातळीवर बसलेली आहे. त्या व्यवस्थेचा विरोध ओबीसीच्या आरक्षणामध्ये असणं हे नवीन नाही. पण आज जे वेगळं प्रेम महाराष्ट्रातील भाजप दाखवत आहे की आम्ही ओबीसीचेच कर्णधार आहोत. त्याचं ओबीसीशी काही देणंघेणं नाही हे आता समाजाला कळलेलं आहे., असं नाना पटोलेंनी म्हटलं.
दरम्यान, आज जे मगरीचे अश्रु भाजप वाहत आहे, ते ओबीसी समाजानं ओळखून घेतलं आहे. त्यामुळं भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय ओबीसी समाज शांत बसणार नाही, असा हल्लाबोल नाना पटोलेंनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
आज पुन्हा पेट्रोल दरात वाढ; जाणून घ्या नवीन दर
संभाजीराजेंची हेरगिरी करण्याचा प्रश्नच नाही- दिलीप वळसे पाटील
मराठ्यांना आरक्षण मिळावे या मताचे उद्धव ठाकरे कधीच नव्हते- नारायण राणे
सरकारला लाथा घातल्याशिवाय जाग येत नाही; EWS आरक्षणावरून विनायक मेटेंचा घणाघात