आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : भाजपाकडून महाराष्ट्र व उत्तर भारतीयांना बदनाम करण्याचे काम केलं आहे. असा आरोप करत सार्वजिनक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
मुंबईसह महाराष्ट्रात विविध राज्यातील लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. यापूर्वीही काही राजकीय पक्षांनी उत्तर भारतीयांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी कोरोना पसरवला असा आरोप महत्वाच्या पदावरील व्यक्तीने करुन त्यांचा अपमान केला. कोरोना काळात महाराष्ट्रातून 842 रेल्वेच्या माध्यमातून लाखो लोकांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचे काम महाराष्ट्र सरकारने केले आहे. पण भाजपाकडून महाराष्ट्र व उत्तर भारतीयांना बदनाम करण्याचे काम केले, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
हे ही वाचा : काँग्रेसचं राष्ट्रवादीला मोठं खिंडार; सेलुच्या नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
दरम्यान, टिळक भवन येथे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष उमाकांत अग्निहोत्री, प्रदेश पदाधिकारी तसेच जिल्हा अध्यक्षांचा पदग्रहण सोहळा पार पडला. यावेळी सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा यांच्यासह उत्तर भारतीय सेलचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
महत्वाच्या घडामोडी –
सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये; आदित्य ठाकरेंची जोरदार टोलेबाजी
“राज ठाकरे फुंकणार महापालिका निवडणुकीचे रणशिंग; पक्षाची ताकद वाढवण्यासाठी 25 तारखेला पुणे दाैऱ्यावर”
किरीट सोमय्या म्हणाले, कोव्हिड घोटाळ्याला ठाकरे जबाबदार, आता आदित्य ठाकरे म्हणतात…