Home महाराष्ट्र लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून भाजपाचे छुपे राजकारण; किशोरी पेडणेकरांची टीका

लता मंगेशकर यांच्या स्मारकावरून भाजपाचे छुपे राजकारण; किशोरी पेडणेकरांची टीका

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनानंतर आता त्यांच्या स्मारकावरुन राजकारण सुरु झालं आहे. शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात याच ठिकाणी त्यांचे स्मारक करण्याची मागणी करण्यात येत आहे. यावरुन चांगलाच वाद रंगला असून यावरुन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपावर टीका केली आहे.

मी वैयक्तिक म्हणून बोलतेय, लता दिदींची उंची कोणीही मोजू नका. त्या खूप मोठ्या होत्या. त्यांचं स्मारक झाले पाहिजे. केवळ मुंबई, महाराष्ट्रात नाही तर जगभरात स्मारकं व्हायला हवीत. मात्र, भाजपनं या मुद्द्यावरुन वितुष्ट निर्माण केलंय, वादविवाद करुन राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये. भाजप याबाबत छुपं राजकारण करत आहे. भाजपने हे राजकारण थांबवावं, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

हे ही वाचा : अजित पवारांनी आयुष्यभर जमिनी लाटण्याचं काम केलं; चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

दरम्यान, भाजपा आमदार राम कदम यांनी लता दिदींच्या पार्थिवार अंत्यसंस्कार झाले त्याच ठिकाणी त्यांचे स्मारक व्हावे अशी मागणी केली होती. त्या मागणीबाबत महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, लतादीदींवरुन वाद घालणारा तथाकथित आमदार आहे, त्याला कळलं पाहीजे की एवढ्या मोठ्या महान गायिकेचा राजकारणासाठी वापर केला जात आहे. हे योग्य नाही, अशी खंतही किशोरी पेडणेकरांनी यावेळी व्यक्त केली.

महत्वाच्या घडामोडी –

“महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापुढे कधी झुकला नाही आणि झुकणारही नाही”

मुंबई अनलॉक कधी होणार?; महापौर किशोरी पेडणेकर, म्हणाल्या…

लता मंगेशकरांच्या स्मारकावरुन वाद रंगला; आता मनसेचीही प्रतिक्रिया, म्हणाले…