महाराष्ट्रातील भाजपचे नेते करणार दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार

0
512

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकांचे बिगुल वाजले आसून आता महाराष्ट्रातून मदत मिळणार आहे. आजपासून महाराष्ट्रातील भाजपचे नेते दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार करणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्र राज्यातून जवळपास 25 नेत्यांवर दिल्लीतील निवडणुकीची जबाबदारी दिली असून प्रामुख्याने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विनोद तावडे हे आजच प्रचारासाठी दिल्लीत दाखल होणार आहेत. तर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार आशिष शेलार हे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रचार करणार आहेत.

निवडणूक अयोगाने दिल्ली विधानसभेची तारिख जाहिर केली असून 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. तर 11 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होईल.

दरम्यान, दिल्लीत एकाच टप्प्यात सर्व 70 जागांसाठी मतदान होणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्त्वातील आम आदमी पक्षाच्या सरकारने दिल्लीत पाच वर्ष पूर्णपणे सत्ता राखली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नाही- रुपाली चाकणकर

दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं- देवेंद्र फडणवीस

“कानाखालचा रंग बदलणं काय असतं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावरच कळेल”

बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरु, त्यांच्या तलमीत मी तयार झालो- नारायण राणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here