आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
गांधीनगर : गांधीनगर गुजरात महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने 44 पैकी 41 जागा जिंकत महापालिकेवर विजय मिळवलाय. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी अशी तिरंगी लढत झाली होती. यामध्ये काँग्रेसला 2 तर आम आदमी पार्टीला 1 जागा मिळाली.
मनपाच्या 11 वॉर्डामधील 44 जागांसाठी 162 उमेदवार रिंगणात होते. एससी प्रवर्गाच्या सर्व पाच जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले आहेत. मतदान रविवारी झाले होते. आज मतमोजणी झाली. 56.24 टक्के मतदान झाले होते.
दरम्यान, भाजपा आणि काँग्रेसने सर्व 44 जगावर उमेदवार उभे केले होते. आम आदमी पार्टीने 40 तर बसपाने 14, राष्ट्रवादी काँग्रेसने 2 आणि इतर पक्षांनी सहा उमेदवार उभे केले होते. 11 उमेदवार अपक्ष होते.
महत्वाच्या घडामोडी –
भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! अशोक चव्हाण म्हणतात…
“शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे, मगरीचे अश्रू पुसण्याचं काम”
“काँग्रेसला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीची गरज”
नारायण राणेंनी वेंगुर्ला पालिकेत फडकवला भाजपचा झेंडा; महाविकास आघाडीला चारली धूळ!