Home महाराष्ट्र “शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे, मगरीचे अश्रू पुसण्याचं काम”

“शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे, मगरीचे अश्रू पुसण्याचं काम”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

सोलापूर : ऊसाच्या एफआरपीची रक्कम एकरकमी मिळावी या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापुरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.

राज्यातील साखर सम्राटांचे नेतृत्व शरद पवार यांनी केले. दिल्लीत जाऊन साखर सम्राटांनी लॉबिंग केलं. एफआरपीची रक्कम तीन टप्प्यात देण्याचे अहवाल निती आयोगाकडे दिले. आमचा साखर सम्राटांवर विश्वास नाही, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली.

शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे मगरीचे अश्रू पुसण्याचं काम आहे. एकीकडं शेतकऱ्यांना शेतमाल विकण्याचा अधिकार मिळाला पाहिज, असं शरद पवार आपल्या आत्मचरित्रात लिहीतात. मात्र, त्यांनीच कृषी मंत्री असताना शेतीचा पहिला कराराचा प्रयोग 2005 मध्ये आणला., असंही सदाभाऊ खोत यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

“काँग्रेसला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीची गरज”

नारायण राणेंनी वेंगुर्ला पालिकेत फडकवला भाजपचा झेंडा; महाविकास आघाडीला चारली धूळ!

गुजरातमध्ये 21 कोटींचे ड्रग्ज सापडलं त्याचं काय?; संजय राऊतांचा सवाल

उत्तर प्रदेश हे राम राज्य नाही, तर किलींग राज्य; ममता बॅनर्जींचा हल्लाबोल