गांधीनगर : गुजरातमध्ये व्हायरल झालेल्या एका अश्लिल व्हिडिओमुळे खळबळ उडाली आहे. तसेच हा व्हिडिओ भाजपचे खासदार परबत पटेल यांचा असल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे गुजरातमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
विशेष म्हणजे, आम आदमी पार्टीच्या एका नेत्यानं हा दावा केला आहे की, तो व्हिडिओ 15 ऑगस्टपर्यंत सर्वांसमोर आणणार आहे. मात्र त्याआधीच हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाल्यानं खळबळ उडाली आहे.
आपचे नेते मधाबाई पटेल यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमधील व्यक्ती भाजप खासदार परबत पटेल असल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र हे कटकारस्थान असल्याचं म्हणत परबत पटेल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
दरम्यान, पोलिसांनी अश्लिल व्हिडिओ बनवऱ्याला अटक केली आहे., अशी माहिती बनासकंठाचे पोलिस उपअधिक्षक पी.एस.चाैधरी यांनी दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
…तरी पंकजाताईंच्या सत्कारानंतर यात्रेची पुढची वाटचाल करणार; केंद्रीय मंत्री भागवत कराड भावुक
मुंबईतल्या समुद्रात 50 हजार कोटींचा पूल उभारणार- नितीन गडकरी
“ठाकरे सरकारची नोंद महाराष्ट्राच्या इतिहासात सर्वात लबाड सरकार म्हणून होईल”