आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला भाजपाकडून मोठा धक्का बसला आहे. शिरुर, खेड व पुरंदर तालुक्यातील उध्दव ठाकरे गटाच्या तब्बल अडीचशे ते तीनशे महत्वाच्या पदाधिका-यांनी काल मुंबईत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला. या पक्षप्रवेशासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे तर उपस्थित होतेच, शिवाय यातील प्रमुख पदाधिका-यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री अकरा वाजता तासभर दीर्घ चर्चा ही केली.
ही बातमी पण वाचा : “KKR च्या फिरकीसमोर RCB फेल, KKR चा RCB वर 82 धावांनी दणदणीत विजय”
शिवसेनेचे नेते राम गावडे, यांच्यासह जयश्री पलांडे, अॅड.गणेश सांडभोर,भानुकाका जगताप, पत्रकार प्रदीप जगताप, संतोष जगताप, संदीप देवकर आदींनी आपल्या गावोगावच्या प्रमुख पदाधिका-यांसह भाजपात पक्षप्रवेश केला.
दरम्यान, यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जालींदर कामठे, जुन्नरच्या नेत्या आशा बुचके, धमेंद्र खांडरे, राजेंद्र कोरेकर, आबासाहेब सोनवणे आदींसह पुणे जिल्ह्यातील सर्व प्रमुख भाजपा पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
महत्त्वाच्या घडामोडी
“आपलं हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी, ठाकरेंकडून महिलांचा ढाल म्हणून वापर”
“कोरोना पुन्हा फैलावतोय, सांगली कारागृहात कोरोनाची एंट्री, प्रशासन अलर्टवर”