Home महाराष्ट्र भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

भाजपाचा राष्ट्रवादीला मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी निवडणूकिच्या पार्श्वभूमीवर भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या माजी जिल्हा निरीक्षक डॉ. अर्चना पाटील यांनी काल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला.

हे ही वाचा :  उद्धव ठाकरेंच्या मदतीला बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक धावला; ‘या’ नेत्याची शिवसेनेत घरवापसी

डॉ. अर्चना पाटील यांनी यापूर्वी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सचिव म्हणून काम केले आहे. दोन वर्षांपूर्वी त्यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी थेट सातारा जिल्हा निरीक्षकपदी अर्चना पाटील यांची नियुक्ती केली होती.

दरम्यान, डॉ. अर्चना पाटील ह्या मूळच्या इंदापूर तालुक्यातील लासुर्णे येथील आहेत. अर्चना पाटील यांचे आजोबा दिनकरराव पाटील यांचा माजी खासदार शंकरराव पाटील यांच्या विरोधात विधानसभेला पराभव झाला होता.

महत्त्वाच्या  घडामोडी –

 केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पीएफआयवर बंदी; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मानले अमित शहांचे आभार, म्हणाले…

…अन् ती एक गोष्ट केली की, शरद पवार पुन्हा सत्तेत येतात; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान

शिवसेना का फुटली?, याचं उत्तर…; शिंदे गटातील नेते रामदास कदम यांचं मोठं विधान