भाजपचा राष्ट्रवादीला मोठा धक्का ; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपामध्ये प्रवेश

0
2533

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

इंदापूर : आगामी निवडणुकांच्या तोंडावर इंदापूर मध्ये भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसला अर्थात माजी राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे यांना धक्का दिला आहे.

इंदापूर पंचायत समितीचे माजी उपसभापती कांतिलाल बोराटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बोराटे यांच्यासह अनेक सहकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

हे ही वाचा : महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातमध्ये; राज ठाकरेंची शिंदे सरकारवर टीका, म्हणाले…

दरम्यान, या पक्षप्रवेश सोहळ्याला हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. इंदापूर तालुक्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी केवळ खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. मात्र राज्यात स्थापन झालेले सरकार हे जनतेचे आहे. कांतीलाल बोराटे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी भाजपची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश केला, असं हर्षर्धन पाटील यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या  घडामोडी –

नितेश राणे म्हणाले, हिंदूह्रदयसम्राट म्हणजे फडणवीस; आता शिंदे गटातील प्रवक्ते दीपक केसरकरांचा पलटवार, म्हणाले…

“शिंदे गटातील 17 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लवकरच मातोश्रीवर परतणार”

“एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला दणका; तब्बल ‘इतके’ नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here