आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अतिवृष्टी, पूर आणि वादळामुळे नुकसान सोसावं लागणाऱ्या शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने अल्प मदत केली आहे. त्याच्या निषेधार्थ येत्या 1 नोव्हेंबर रोजी भाजपचे एक लाख कार्यकर्ते काळ्या फिती लावून अभिनव आंदोलन करणार आहेत. अशी घोषणा भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज पत्रकार परिषद घेत केली आहे.
राज्यात गेल्या दोन वर्षांपासून वादळे, अतिवृष्टी, नापिकीमुळे भरडल्या गेलेल्या शेतकऱ्याच्या हातात सरकारी मदतीचा एक पैसादेखील पडलेला नाही. या सरकारने राज्यातील शेतकऱ्याची फसवणूक केली आहे. शेतकऱ्याच्या या संतापात सहभागी होऊन त्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन असेल, अशी माहिती केशव उपाध्ये यांनी दिली आहे.
हे ही वाचा : निलेश राणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात; नारायण राणेंनी प्रचारासाठी कसली कंबर
ठाकरे सरकार सत्तेवर आल्यानंतर काही महिन्यांतच राज्यात निसर्ग वादळामुळे वाताहत झाली. हजारो शेतकरी कुटुंबे उद्ध्वस्त झाली आणि पुढील किमान दहा वर्षे पुन्हा उभे राहता येणार नाही अशी अपरिमित हानी झाली. या शेतकऱ्यांकरिता ठाकरे सरकारने मदतीची जोरदार घोषणाबाजीही केली. पण त्या मदतीचा पैसा वर्षानंतरही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नव्हता, हे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातच स्पष्ट झाले, असं केशव उपाध्येंनी म्हटलं आहे.
दरम्यान, मदत का मिळाली नाही याची माहिती घेतो, असे बोलघेवडे आश्वासन देऊन मुख्यमंत्री ठाकरे मुंबईत परतले, पण मंत्रालयाकडे मात्र फिरकलेच नाहीत. त्यामुळे मदतीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यास न्याय मिळालाच नाही, असंही केशव उपाध्ये म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेत प्रवेशाचा धडाका; चंद्रपूर जिल्ह्यातील असंख्य नागरिकांचा मनसेत प्रवेश
हिंमत असेल तर नारायण राणेंनी…; शिवसेनेचे नेते विनायक राऊत यांच आव्हान
महाविकास आघाडी आणि भाजपची प्रतिष्ठा पणाला; देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू