Home पुणे पिंपरी – चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का मिळणार! सात नगरसेवक ‘या’ पक्षाच्या संपर्कात

पिंपरी – चिंचवडमध्ये भाजपला मोठा धक्का मिळणार! सात नगरसेवक ‘या’ पक्षाच्या संपर्कात

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : पिंपरी – चिंचवड महापालिकेत सध्या भाजपाची सत्ता आहे. मात्र मागील साडेचार वर्षापासून पक्षाने संधी तथा पालिकेत पद न दिल्याने भाजपचे सात नगरसेवक पक्षनेतृत्वाव नाराज असल्याची माहिती समोर आली आहे . त्यामुळे या सात नगरसेवकांनी वेगळाच मार्ग निवडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. हे पाहता येत्या काळात भाजपाला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तवितवली जात आहे.

हे ही वाचा : किरीट सोमय्या 26 ऑक्टोबरला नांदेड दौऱ्यावर, सचिन सावंत म्हणतात…

भाजपचे हे नाराज नगरसेवक दिल्लीत सत्ता असलेल्या `आप या राजकीय पक्षाच्या संपर्कात असून त्यांच्यासोबत आतापर्यंत दोन बैठका झाल्या असे ‘आप’चे प्रदेश संघटक विजय कुंभार यांनी सांगितले. तसेच येत्या 2022 मध्ये आप पक्ष पिंपरी-चिंचवडच नाही, तर पुणे महापालिकेचीही निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

दरम्यान, पिंपरी – चिंचवडमधील भाजपचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

“आरोग्य विभागाच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ, प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर पोहचल्याच नाहीत”

 आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी भाजपने हिंदू-मुस्लीम वाद निर्माण केला; नाना पटोलेंचा आरोप

भाजपचे 18 लोक शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी भेटून गेलेत; संजय राऊतांचा मोठा गाैफ्यस्फोट