आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पणजी : भाजपचे वर्चस्व कमी होणार या भ्रमात काँग्रेसने राहू नये. पुढील अनेक दशके भारतीय राजकारणावर भाजपचे वर्चस्व राहणार आहे. काँग्रेसला पुढील अनेक दशके भाजपाशी सामना करावा लागणार आहे, असा दावा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी केला आहे. सध्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी काम करत असून, गोव्याच्या दौऱ्यावर असतानात्यांनी हा दावा केला.
राहुल गांधी भाजपा केवळ मोदी लाटेपर्यंतच सत्तेत राहणार आहे या मोठ्या भ्रमात जगत आहे. भाजपा विजयी होईल किंवा पराभूत, पण काँग्रेसच्या 40 वर्षांच्या कारभाराप्रमाणेच ते भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहतील. असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा : “एका महिलेशी बोलताना भाषा कशी वापरली पाहिजे पवार साहेबांनी शिकवलं नाही का?”
भाजपा कुठेही जाणार नाही. तुम्हाला भारतात 30 टक्के मते मिळाली की तुम्ही इतक्या लवकर कुठेही जाणार नाही. त्यामुळे लोक संतप्त होऊन मोदींना उखडून टाकतील या भ्रमात कधीही राहू नका. लोक मोदींना हटवू शकतात, पण भाजपा कुठेही जाणार नाही. पुढील अनेक दशके तुम्हाला भाजपाचा सामना करावा लागेल, असं प्रशांत किशोर म्हणाले आहेत.
दरम्यान, वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत तृणमूलने विजय मिळवल्यानंतर ममता बॅनर्जींसोबत काम करत नसल्याचं प्रशांत किशोर यांनी जाहीर केलं होतं. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात अशा चर्चा सुरु झल्या होत्या. मात्र चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आता प्रशांत किशोर पुन्हा एकदा तृणमूलसोबत काम करत आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलसाठी गोव्यात दाखल झाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“एका महिलेची बदनामी होत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गप्प का?”
‘…तर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा’; भाजपच्या ‘या’ नेत्यांची मागणी
समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक, त्यांना लाज वाटली पाहिजे- किरीट सोमय्या