आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड पालिकेतून भाजपाची सत्ता घालवायची आहे, त्यामुळे तर एक-दोन पावलं मागे होऊयात. महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांशी समन्वय साधूया, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.
एखाद्या ठिकाणी ते एक-दोन पावलं मागे होतील, एखाद्या ठिकाणी आपण एक-दोन पावलं मागे होऊयात. शेवटी आपलं सर्वांचं पहिलं ध्येय पिंपरी चिंचवड पालिकेतून भाजपाची सत्ता घालवायची हेच आहे. त्यामुळे ही भूमिका घेऊन तुम्हाला आणि मला पुढं जायचं आहे, असं अजित पवार म्हणाले आहेत.
हे ही वाचा : भाजपकडून शिवसेनेला खिंडार; शिवसेनेचे माजी आमदार भाजपच्या वाटेवर?
दरम्यान, काँग्रेसला स्वबळावर लढायचं तर लढू दे, मात्र शिवसेनेशी आघाडीची मानसिकता ठेवू. महाविकास आघाडी असल्यानं आता तिकीट वाटप कसं होणार, अशी तुम्ही चर्चा करत असलाच. काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच सांगितलंय आम्ही निवडणूका स्वबळावर लढणार,हे मी नव्हे तर त्यांनी आधीच सांगितलंय. त्यामुळे तो प्रश्न मिटलाय, कारण ते आता स्वबळावर लढणार आहेत, असंही अजित पवारांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
इचलकरंजी नगरपालिका भाजपमुक्त करायची- सतेज पाटील
“शिवसेनेने निवडणुकीसाठी युती एकाशी आणि सत्तेसाठी सोयरिक तुमच्याशी केली, हे तुम्ही बरं खपवून घेतलंत”
जनतेनंही ठरवलंय, 2024 मध्ये बदल हवाच, उघड दार देवा आता उघड दार…