“भाजपचा शिवसेना व शिंदे गटाला धक्का; ‘या’ 2 मोठ्या नेत्यांनी फडणवीसांच्या उपस्थितीत केला भाजपमध्ये प्रवेश”

0
542

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पालघर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंड करत शिवसेनेत मोठी फूट पाडली. त्यानंतर शिवसेनेतील अनेक नेत्यांनी शिंदे गटात प्रवेश करण्यास सूरूवात केली आहे. मात्र आता भाजपने शिवसेना व शिंदे गट दोघांना मोठा धक्का दिला आहे.

पालघरमधील शिवसेनेचे दोन्ही माजी आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यामध्ये एक शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते होते तर एक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते होते.

हे ही वाचा : हाताच्या बोटावर मोजण्याइतकेही ज्यांना आमदार आणता येत नाही, त्यांच्याबद्दल…; शरद पवारांचा राज ठाकरेंना टोला

शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा व शिंदे गटातील कार्यकर्ते विलास तरे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, अमित घोडा व विलास तरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने भाजपचं बळ आणखी वाढलं आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

निजामशहा, आदिलशहा जसं स्वराज्यावर चालून आले होते, तसं अमित शहा मुंबईवर चालून आलेत, पण त्यांना माहीत नाही की…; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

शिंदे गटात प्रवेश केलेल्या ‘या’ मोठ्या नेत्याची नाशिकमध्ये येण्याआधीच हकालपट्टी

प्रसिद्ध उद्योजक गाैतम अदानी यांनी मातोश्रीवर जाऊन घेतली उद्धव ठाकरेंची भेट; तासभर खलबतं, चर्चांना उधाण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here