आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नांदेड : काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनामुळं नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपनं शिवसेनेतील नाराज असलेले सुभाष साबणे यांना पक्षात प्रवेश देत उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने रावसाहेब अंतारपूरकर यांचे चिरंजीव जितेश अंतापूरकर यांना उमेदवारी दिली आहे.
भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार! पण लॉटरी एकदाच लागते; नेहमी-नेहमी नाही, हे भाजपने लक्षात ठेवावं, असा इशारा माजी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपाला दिला आहे.
काल भाजपची सभा देगलूर झाली, भाजपनं पंढरपूरची पुनरावृ्त्ती होणार, असं म्हटलं. दोस्तहो लॉटरी किती वेळा लागते, एकदाच लागते. जीवनात पुन्हा लॉटरी लावल्यास पैसे जात राहतात. पंढरपूरची लॉटरी भाजपला एकदा लागली. वारंवार ती लागणार आहे. आम्हाला काम करणाऱ्याला ताकद द्यायची आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.
दरम्यान, भाजपसाठी पोटनिवडणूक सट्टा आहे, नांदेड जिल्हा हा सट्टाबाजार नाही. नांदेड जिल्हा हा विकासाच्या वाटेवर चालणारा, शंकरराव चव्हाण यांच्या विचारांवर चालणारा जिल्हा आहे. रावसाहेब अंतापूरकर यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली देण्याच्या विचारातून देगलूर बिलोलीची जनता जितेश अंतापूरकर यांना विजयी करेल यात शंका नाही, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
भाजप म्हणते, देगलूरमध्ये पंढरपूरची पुनरावृत्ती होणार!
पण लॉटरी एकदाच लागते; नेहमी-नेहमी नाही, हे भाजपने लक्षात ठेवावं. pic.twitter.com/37UWkHqw2w— Ashok Chavan (@AshokChavanINC) October 5, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“शरद पवारांचा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणजे, मगरीचे अश्रू पुसण्याचं काम”
“काँग्रेसला राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष करण्यासाठी युवाशक्तीची गरज”
नारायण राणेंनी वेंगुर्ला पालिकेत फडकवला भाजपचा झेंडा; महाविकास आघाडीला चारली धूळ!
गुजरातमध्ये 21 कोटींचे ड्रग्ज सापडलं त्याचं काय?; संजय राऊतांचा सवाल