आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : महाराष्ट्रात महाविकासआघाडी सरकार आल्यानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या होत्या. जळगावात गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपमधील 30 नगरसेवकांनी बंड पुकारत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हातावर शिवबंधन बांधले होते. काही काळ उलटत नाही तोच जळगाव महापालिकेतील भाजपच्या तीन बंडखोर नगरसेवकांनी पुन्हा घरवापसी केली आहे.
भाजपचे माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत तीन बंडखोर नगरसेवकांनी पुन्हा भाजपात प्रवेश केला आहे. आगामी काळात होणार्या स्थायी समितीच्या निवडणुकीपूर्वी शिवसेनेला पाठींबा देणारे भाजपचे 3 बंडखोर नगरसेवक स्वगृही परतल्याने हा शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दरम्यान, महापालिकेत भाजपचे 57 नगरसेवक निवडून आल्याने गेल्या अडीच वर्षापूर्वी मनपात भाजपाची सत्ता होती. मात्र, काही महिन्यांपूर्वी भाजपातील 30 नगरसेवकांनी बंडखोरी करीत मुंबईला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत हातावर शिवबंधन बांधले होते. त्यामुळे मनपात सत्ता परिवर्तन होवून महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला होता.
महत्वाच्या घडामोडी –
सामनाचं नाव बदलून आता बाबरनामा ठेवा; गोपीचंद पडळकरांची टीका
शिवसेनेत जोरदार इनकमिंग, काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश”
शिवसेनेतून माझी हकालपट्टी?, उगाच काही तरी म्हणू नका; राणे मीडियावरच भडकले