Home देश उत्तराखंडमध्ये भाजपला धक्का; सहा आमदारांचा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश

उत्तराखंडमध्ये भाजपला धक्का; सहा आमदारांचा लवकरच काँग्रेसमध्ये प्रवेश

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

डेहराडून : निवडणुकीच्या पार्शभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच भाजपाचे अनेक आमदार पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. असा दावा काँग्रेस नेते गोविंदसिंग कुंजवाल यांनी केला आहे. त्यामुळे उत्तराखंड भाजपामध्ये लवकरच भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुंजवाल यांनी येत्या काही दिवसांत भाजपाचे सहा आमदार काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा करतानाच राज्यात काँग्रेसचेच सरकार स्थापन होणार असल्याचंही म्हटलं आहे. मात्र, कुंजवाल यांच्या या दाव्याने भाजपाच्या तंबूत खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : “देशाला राज ठाकरेंसारख्या नेत्याची गरज, ते जे बोलतात ते करतात”

भाजपा सरकार हे निष्क्रिय आहे, असा हल्लबोल करत डबल इंजिनचे सरकार असूनही विकास होत नाही. लोकांच्या मूलभूत गरजाही पूर्ण केल्या जात नाहीत. जनता काँग्रेसकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. जनता भाजपाला धडा शिकवण्याच्या तयारीत आहे. तीन आमदार गढवाल मंडल येथील आणि तीन कुमाऊ येथील आहेत असं कुंजवाल म्हणाले आहेत.

दरम्यान, जनतेच्या नाराजीचा फटका बसण्याची भीती आमदारांना वाटत आहे. यामुळेच हे सहा आमदार काँग्रेसच्या वाटेवर आहेत. येत्या 15 दिवसांत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं कुंजवाल यांनी यावेळी सांगितलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात ; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा

शिवसेनेचे 12 तर राष्ट्रवादीचे अनेक आमदार भाजपच्या संपर्कात ; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा

विदर्भातही मनसेचा जोर वाढला; अनेकांचा मनसेत प्रवेश