भाजपनेच ओबीसी व मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला- जयंत पाटील

0
467

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जालना : भाजपनेच ओबीसी व मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.

जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा सुरू झाली आहे. आज या यात्रेचा दुसरा दिवस आहे. जालना शहर व ग्रामीण पदाधिकार्‍यांशी जयंत पाटील यांनी याठिकाणी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नेहमी राहिली आहे. केंद्रसरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी लोकसंख्येला धक्का बसला आहे. इम्पिरिकल डाटा देण्यास केंद्रसरकारने नकार दिला आहे. मात्र असे असतानाही राज्य सरकारने घेतलेल्या काही निर्णयामुळे ओबीसींच्या जागा सुरक्षित झाल्या हे आपल्या सरकारचे श्रेय आहे, असं जयंत पाटील म्हणाले.

दरम्यान, शरद पवार यांना या जिल्हयाकडून फार मोठया अपेक्षा आहेत. सत्ता येते – जाते त्यामुळे सत्ता टिकायची असेल तर संघटन फार महत्वाचे आहे, असंही जयंत पाटलांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

‘धार्मिक स्थळे उघडून मोठे काहीतरी केल्याचा टेंभा मिरवू नका’; आशिष शेलारांची राज सरकारवर टीका

राष्ट्रवादीत जोरदार इन्कमिंग ; शिवसेनेच्या ‘या’ माजी आमदारांसह अनेकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

‘राज्य सरकारने मला उपोषणाला बसण्याला भाग पाडू नये; संभाजी छत्रपतींचा इशारा

धोनीला लागली एक वेगळीच सवय, बायको साक्षी म्हणते…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here