आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाकडून जय्यत तयारी सुरु आहे. अशातच राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची जाहीरपणे माफी मागितल्यशिवाय त्यांना अयोध्येत घुसू देणार नाही, असा इशारा भाजपाचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी दिला होता. त्यानंतर त्यांनी आज राज ठाकरे दबंग नसून उंदीर आहेत अशी टीका केली आहे. त्यांच्या या टीकेवर आता मनसेकडून प्रतिक्रिया आली आहे.
हे ही वाचा : “भाजपमध्ये पक्षप्रवेशाची लाट; तब्बल ‘इतक्या’ डाॅक्टर्संनी हाती घेतला भाजपचा झेंडा”
बृजभूषण शरण सिंह यांची भूमिका ठाम असली तरी राज ठाकरेंनी दौरा जाहीर केला आहे. त्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर ते बोलतील. एका खासदाराने मांडलेलं मत हे उत्तर प्रदेशचं असू शकत नाही. आमच्या अयोध्या दौऱ्याचा कार्यक्रम निश्चित झाला आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
दरम्यान, बाळा नांदगावकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर भाष्य केलं. राज ठाकरेंच्या निवासस्थानी मनसेच्या प्रवक्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर बाळा नांदगावर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
महत्वाच्या घडामोडी –
कोरोनाची चाैथी लाट जून-जुलैमध्ये?; राजेश टोपेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…
“…आणि संजय राऊत-अजित पवार आपापसातच भिडले”
“खासदार उदयनराजे भोसलेंनी घेतली, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची भेट, राजकीय चर्चांना उधाण”