Home महाराष्ट्र “भाजप-मनसे युती होणार?; लवकरच चांगली बातमी मिळेल”

“भाजप-मनसे युती होणार?; लवकरच चांगली बातमी मिळेल”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवतीर्थावर पदाधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीनंतर बाळा नांदगावकर यांनी मनसे-भाजप युतीवर भाष्य केलं आहे. आगामी निवडणुकांमध्ये मनसे आणि भाजपची युती होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी बाळा नांदगावकर याना विचारला असता त्यांनी सूचक विधान केले.

हे ही वाचा : ज्यांच्या नवऱ्याने लाच खालली त्या आम्हांला हिशेब मागत आहेत; रूपाली चाकणकरांचा चित्रा वाघ यांना टोला

एकला चलो यामधून आम्ही निवडणूका लढवल्या आहेत. मात्र तुर्तास तरी भाजपा सोबत युती करण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र ‘तुम्हाला लवकरच चांगली बातमी मिळेल’, असं बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

दरम्यान, बाळा नांदगावकर यांनी केलेल्या विधानामुळे युती होण्याचे हे संकेत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

मनसे अध्यक्ष राज ठाकरे 14 डिसेंबरला मराठवाड्या दाैऱ्यावर; आगामी निवडणूकींच्या पार्श्वभूमीवर बैठक

“राज्य सरकारचा मोठा निर्णय; अखेर माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचं निलंबन”

“अखेर ठरलं! जळगाव जिल्हा बँकेचं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडं, तर उपाध्यक्षपद शिवसेनेकडं”