मुंबई : तांडव या वेबसीरिज विरोधात भाजपचे आमदार राम कदम यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलं होतं., याप्रकरणी घाटकोपर येथील चिरागनगर पोलिसांनी राम कदम यांना ताब्यात घेतलं आहे.
तांडव वेबसीरिजमध्ये हिंदू देवतांचा अपमान झाल्याबाबत अनेक तक्रारी आल्या आहेत. मात्र निर्मात्यांविरोधात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. महाविकास आघाडी सरकार पोलिसांवर दबाव टाकत आहे, असं राम कदम म्हणाले.
दरम्यान, तांडव वेबसीरिजच्या निर्मात्यांविरोधात मुंबई पोलीस कारवाई करण्यास तयार आहेत. मात्र, राज्य सरकार त्यांना रोखत आहेत, असंही राम कदम यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी-
राज्यात महाआघाडीसमोर भाजप 20 टक्के देखील नाही- जयंत पाटील
“ग्रामपंचायतीचे निकाल पाहता भाजपची सूज लोकांनी उतरवली आहे”
“मी सुद्धा खासदार आहे, असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे”