“दादरा नगर हवेलीत मोदींचं नाव न घेता भाजपला माती चारली, ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले”

0
283

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : नांदेडमधील देगलूर बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार जितेश अंतापूरकर विजयी झाले. तसेच शिवसेनेने दिवाळीला सीमोल्लंघन करत दादरा नगर हवेलीत भगवा फडकविला. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे.

हे ही वाचा : पालघरमध्ये होणार विमानतळ; पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंची घोषणा

ऐन दिवाळीत भाजपचे कंदील विझले आहेत. हा शुभशकुन नाही. आपणच अजिंक्य आणि अजेय आहोत या भाजपच्या अहंकारालाही या पोटनिवडणुकीच्या निकालामुळे तडा गेला आहे., असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावला.

13 राज्यातील पोटनिवडणुकींचे निकाल सांगतात. लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 29 जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या. त्यामध्ये काँग्रेसने मुसंडी मारलीच, पण दादरा नगर हवेलीत शिवसेनेने जोरदार विजय मिळवला. महाराष्ट्राबाहेर शिवसेनेचा पहिला खासदार निवडून येण्याचा मान कलाबेन डेलकरांनी मिळवला आहे, असं म्हणत राऊतांनी डेलकरांचं काैतुक केलं आहे. तसेच गुजरातच्या सीमेवरील प्रदेशात मोदींचे नाव न घेता शिवसेना जिंकली, देगलुरला ‘मोदी मोदी’ करूनही भाजपला माती खावी लागली., अशी टीकाही राऊतांनी यावेळी केली.

महत्वाच्या घडामोडी – 

भारताची विजयी आतषबाजी; अफगाणिस्तानवर 66 धावांनी विजय

 काँग्रेसने सत्तेत असताना गरिबांच्या भावनांशी खेळ केला- पंकजा मुंडे

समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल होणार की नाही?; दिलीप वळसे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here