“भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्यापेक्षा आपला पराभव स्वीकारावा”

0
438

मुंबई : भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून दिशाभूल करण्यापेक्षा आपला पराभव स्वीकारावा, असं महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकी प्रमाणेच जनतेने या निवडणुकीतही भाजपचा दारूण पराभव करत महाराष्ट्र विकास आघाडीला कौल देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास दाखवला आहे, असं थोरात म्हणाले.

दरम्यान, राज्यातील 4000 हून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. राज्याच्या सर्व भागातील ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडीने 80 टक्के जागा मिळवून प्रचंड मोठा विजय मिळविला असल्याचे थोरात यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

रिषभ पंतची मॅच विनिंग खेळी; भारताची ऑस्ट्रेलियावर 3 विकेट्सनी मात, भारताने मालिका जिंकली

धनंजय मुंडेंवरील संकट दूर होवो; नगरसेवकाचं दोन किलोमीटरपर्यंत दंडवत

“स्वतःला मोठे समजणारे जाणते नेते येणाऱ्या काळात महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर दिसणार नाही”

“…नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here