एकनाथ खडसे यांना बाजूला सारण्याची हिम्मत राज्यातील भाजप नेत्यांमध्ये नाही- पृथ्वीराज चव्हाण

0
246

पुणे : एकनाथ खडसे यांना बाजूला सारण्याची ताकद किंवा हिम्मत राज्यातील भाजप नेत्यांमध्ये नाही, असं वक्तव्य माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित केलेल्या ऑनलाईन कार्यक्रमात ते बोलत होते.

एकनाथ खडसे यांना भाजपने सन्मानाची वागणूक दिली नाही. प्रभावी लोकनेता आणि पर्यायी नेतृत्व असल्यानेच खडसेंना वारंवार लक्ष्य करण्यात आलं. आणि हे करण्याला दिल्लीकरांचा हात असल्याशिवाय महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांमध्ये तेवढी ताकद आणि हिम्मत नाही, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जर मला असाच त्रास होत राहिला तर माझा भरोसा तुम्ही धरू नका. मी माझा स्वतंत्रपणे निर्णय घेईन, असा इशारा खडसे यांनी पक्षाला दिला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी यांच्या मृत्यूवर मुंबई पोलिसांचं भावूक ट्विट

…त्यामुळे काळजी नसावी; शरद पवारांवर केलेल्या टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर

‘लावा’ कंपनी चीनमधील व्यवसाय भारतात हलवणार; करणार ‘इतक्या’ कोटींची गुंतवणूक

निलेश राणेंची शरद पवारांवर टीका; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here