Home महाराष्ट्र भाजप नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढली; हर्षवर्धन पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट

भाजप नेत्यांची राज ठाकरेंसोबत जवळीक वाढली; हर्षवर्धन पाटलांनी घेतली राज ठाकरेंची भेट

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. आज हर्षवर्धन पाटील यांनी लेकीसह राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’वर भेट घेतली.

हे ही वाचा : मागच्या महापालिका निवडणुकीतील रेकॉर्ड तोडून पुण्यात त्यापेक्षा जास्त जागा जिंकू; देवेंद्र फडणवीसांचा दावा

ही भेट राजकीय नव्हती तर कन्या अंकिता  पाटील यांच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी हर्षवर्धन पाटील यांनी राज ठाकरेंची भेट घेतली.

अंकिता पाटील यांनी फेसबुकवरून राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा फोटो शेअर केला आहे. राज ठाकरेंची मुंबईत भेट घेतली, असे कॅप्शन त्यांनी दिलं आहे. लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी अंकिता पाटलांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर लागलीच पुण्यातील बावडा-लाखेवाडी जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली. त्यामध्ये अंकिता पाटील यांनी विजय मिळवत राजकारणात पदार्पण केले. जिल्हा परिषदेची निवडणूक त्यांनी विक्रमी मताधिक्क्याने जिंकली होती. हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले असले तरी अंकिता पाटील अद्यापही काँग्रेसमध्येच आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

“भाजपमध्ये प्रवेश न केल्यामुळं मला तुरूंगात टाकलं; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याचा दावा”

“जैन मुनी पदम सागरजी महाराज ‘शिवतीर्थ’वर; राज ठाकरेंनी पुणे दाैरा अर्धवट सोडला”

शिवसेनेचे ठरलं; गोव्यात स्वबळावर, उत्तरप्रदेशात काँग्रेससोबत निवडणूक लढणार?