सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही; सोमय्या यांच्या नोटीसवरून चंद्रकांत पाटलांची टीका

0
371

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : किरीट सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रवेशबंदीची नोटीस पाठवली आहे. सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, यावरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

किरीट सोमय्यांवर कोणता आरोप आहे, ज्यामुळे तुम्ही त्यांच्या घरासमोर १०० पोलिसांचा वेढा घातला आहे ? मुंबईमध्ये दहशतवादी सापडत असताना तुम्ही झोपा काढत आहात का ? त्यात तुमचे भ्रष्टाचारी मंत्री बेपत्ता आहेत. स्वतःवरील आरोप दाबण्यासाठी तुम्ही हे षडयंत्र रचले आहे, हे जनतेला दिसत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

सरकारच्या दडपशाहीला भाजपा घाबरत नाही. अब्रू नुकसानीचा दावा करताना 25% स्टॅबिलिटी म्हणजे जवळपास 25 कोटी भरावे लागतील. आता एवढी मोठी रक्कम भरण्यासाठी तुम्ही व्हाईट मनी कुठून आणणार ? हाच व्हाईट मनी जमा करण्यासाठी हे लोक गावोगावी हिंडून वर्गणी गोळा करत आहेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

किरीट सोमय्या मुंबईत स्थानबद्ध! देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

सेना-भाजप युतीवर केंद्रीय मंत्री डाॅ.भागवत कराड यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

“…म्हणून किरीट सोमय्या यांना कोल्हापुरात नो एन्ट्री”

“भाजप नेते रावसाहेब दानवे आणि चंद्रकांत पाटील शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here