आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
यवतमाळ : मुंबईत सागर बंगल्यात पोलिसांकडून देवेंद्र फडणवीसांच्या चौकशीला सुरुवात झाली. एसीपी नितीन जाधव यांच्यासह दोन पोलीस निरीक्षक चौकशी करत आहेत. भाजप कार्यकर्त्यांसह नेत्यांची बंगल्याबाहेर गर्दी असून फडणवीस यांच्या समर्थनार्थ भाजपाचे आंदोलन सुरू आहेत. यावरुन काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : दुसरा व्हिडिओ बाॅम्ब उद्या-परवा येतोय; चंद्रकांत पाटलांचा सूचक इशारा
पोलिसांना जर वाटत असेल चौकशी करावी. त्या चौकशीला देवेंद्र फडणवीस यांनी सामोरे गेले पाहिजे. ते स्वतः मुख्यमंत्री होते. गृहमंत्री होते. त्यानी चौकशीला सामोरे गेले पाहिजे, असं मत माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केलंय.
दरम्यान, चौकशीला सामोरे जाताना राज्यभर आंदोलन करून भाजप राजकीय भांडवल करत आहे. हे चुकीचं आहे. वेगळं वातावरण निर्माण करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे, असं माणिकराव ठाकरे म्हणाले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
फडणवीस पुरून उरतील, ते किती तरी ठाकरे-पवार खिशात घालून फिरतात- निलेश राणे
जेलमध्ये गेल्यावर काही लोक…; संदीप देशपांडेचा संजय राऊतांना टोला
“रामदास आठवले यांचाच पक्ष भाजपच्या दावणीला बांधलेला, ते काय शिवसेनेच्या भविष्यावर बोलतील”