आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : नांदेड, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर येथील शासकीय रुग्णालयांमध्ये अनेकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेवर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं आहे. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप सरकारवर खोचक टीका केली आहे.
भाजप चाणक्यला आमदार पुरवायला, गोळा करायला फोडायला वेळ मिळतो. पण इथे शासकीय रुग्णालयात आवश्यक यंत्रणा आणि भरती करायला वेळ नाही., असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
ही बातमी पण वाचा : अजित पवार महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार?; देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
नांदेड शासकीय रुग्णालयातील घटना हृदय पिळून टाकणारी आहे. कुटुंबिय धाय बोकलून रडत होते. नवजात बालकांचा काय दोष आहे? माणुसकी असलेला कोणताही व्यक्ती संवेनशीलतेने हे सगळं पाहू शकत नाही. जे कुटुंब उध्वस्त झाले त्यांना सरकारने आतातरी माणुसकी दाखवत प्रत्येकी 10 लाखांची आर्थिक मदत तातडीने द्यावी”, असंही विजय वडेट्टीवार यांनी यावेळी म्हटलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
Breaking News! महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती
“सांगली न्यूज! रोहित पाटील, सुमनताई पाटील यांच्या लढ्याला अखेर यश, आश्वासनानंतर उपोषण मागे”
राष्ट्रवादीच्या ‘या’ मोठ्या नेत्याच्या नातवाचा कार अपघात; जागीच झाला मृत्यू