आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
नंदूरबार : राजकारणात राजकीय भूकंप येण्याची शक्यता आहे. येत्या मार्चपर्यंत महाराष्ट्रात भाजपचे सरकार स्थापन होईल. आता सर्व काही ठीक होईल, असं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलं होतं. यानंतर आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनीही असंच विधान केलं आहे.
हे ही वाचा : “ठाकरी बाण्यानं विरोधी पक्ष दिशाहीन, भाजप अजूनही सरकार पाडण्याच्या फंदात आणि छंदात”
सरकार तर भाजपचेच येणार आहे. पण आता आम्ही आज, उद्या, परवा अशी भविष्यवाणी करणार नाही. पण महाराष्ट्राच्या भविष्यासाठी भाजपाच्या सरकारशिवाय पर्याय नाही., असं दरेकर म्हणाले. ते नंदूरबारमध्ये माध्यमांशी बोलत होते.
हे तीन तिघाडी सरकार महाराष्ट्राचे भले करू शकत नाही. कारण, सरकार चालवत असताना तुमच्यात एकमत असावे लागते, समन्वय लागतो, निर्णय घ्यावे लागतात, वेळ द्यावा लागतो. मुख्यमंत्री महाराष्ट्रासाठी वेळच देत नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रामधील सगळे प्रकल्प ठप्प पडले आहेत. आरक्षणाचे विषय प्रलंबित आहेत. आरक्षणाचे गाजर दाखवतात, मराठा समाजाला अद्यापही आरक्षण मिळालेले नाही. त्यामुळे या सगळ्यावर जर महाराष्ट्राचं पुन्हा सुरळीत कामकाज सुरू व्हायला पाहिजे, तर या राज्याला सद्य:स्थिती भाजपच्या सरकारचीच आवश्यकता आहे., असंही दरेकर म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
मी ठरवून भाजपचा एकही उमेदवार निवडून येऊ दिला नाही- एकनाथ खडसे
“भाजप-शिवसेना युती होऊ नये ही महाराष्ट्रतील जनतेची इच्छा”
…तर भाजपने आमच्यासोबत मिळून राज्य करावं; संजय राऊतांची थेट ऑफर