Home महाराष्ट्र भाजपाने दाखवला पंकजा मुंडेंवर विश्वास; दिली ‘ही’ मोठी जबाबदरी

भाजपाने दाखवला पंकजा मुंडेंवर विश्वास; दिली ‘ही’ मोठी जबाबदरी

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रीय सचिव झाल्यानंतर भाजपने पंकजा मुंडे यांच्या खांद्यावर मोठी जबाबदरी दिली आहे. भाजपच्या पक्ष श्रेष्ठींनी मुंडे यांना मध्यप्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्त केले आहे. यासंदर्भांत पंकजा यांनी स्वतः दिल्लीत पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

मध्यप्रदेशमध्ये येत्या काळात होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजप सज्ज आहे. मला पक्षाकडून देण्यात आलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी मी परवा मध्यप्रदेशात जाणार आहे. खंडवात तीन विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक सुरू आहे. या ठिकणी भाजपच्या प्रचाराची धुरा सांभाळणार आहे, असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.

हे ही वाचा : हिंदुत्व सोडलेल्या शिवसेनेकडे भाजप ढुंकूनही पहाणार नाही; राजकीय भूकंपावर भाजपाचा पलटवार

प्रत्येक नेत्याला आपले विभाग दिले असून सर्वांकडूनच आपली ताकद पणाला लावण्यात येत आहे. आमचा संकल्प हा अंत्योदयाचा आहे. राजकीय पावलांसोबत आम्ही सामाजिक पावलंही उचलणार आहोत. यासंदर्भात काल बैठकीत चर्चा झाली, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती करणार नाही; राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

“सत्ता गेल्यानंतर कुणाचा तोल जातो, तर कुणी भ्रमिष्ट होतं, यापैकी चंद्रकांत पाटलांचं काय झालं, ते पहावं लागेल”

“शिवसेनेत इनकमिंगचा धुमधडाका; मुक्ताईनगरमध्ये शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश”