Home महाराष्ट्र “भाजपमध्ये गळती सुरूच; बुलढाण्यातील नगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते करणार काँग्रेसमध्ये प्रवेश”

“भाजपमध्ये गळती सुरूच; बुलढाण्यातील नगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते करणार काँग्रेसमध्ये प्रवेश”

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

बुलढाणा : कालच उल्हासनगरमध्ये 22 नगरसेवकांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केलेला असतानाच भाजपला आज आणखी एक मोठा धक्का बसलेला आहे.

बुलढाण्यातील चिखली येथील नगराध्यक्षासह शेकडो कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

हे ही वाचा : “मनसेचं मिशन विदर्भ; अकोला महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढणार”

चिखली नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष प्रिया बोंद्रे या शेकडो कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत चिखली शहरातील एक जिल्हा परिषद सदस्य, नगरपरिषद पाणी पुरवठा सभापतींसह काही पंचायत समिती सदस्य आणि शेकडो भाजपचे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

दरम्यान, बोंद्रे यांच्या पक्षप्रवेशामुळे चिखली शहरात काँग्रेसची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

पेट्रोल, डिझेलची दरवाढ आपल्या भल्यासाठीच; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा केंद्राला टोला

राणेंच्या बालेकिल्यात शिवसेनेचं वर्चस्व; सिंधुदुर्गमध्ये इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांनी केला शिवसेनेत प्रवेश

“पुढील अनेक दशकं भारतीय राजकारणावर भाजपचेच वर्चस्व राहणार, काँग्रेसने भ्रमात राहू नये”