सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मोकळेपणाने काम करता येत नाही. त्यातच सन्मान मिळत नसल्याने काँग्रेसने पाठिंबा काढला तर देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच पुन्हा सत्तेवर येईल, असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद देण्याचं ठरलं नव्हतं. कधीही एकत्र न येणारे सत्तेत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंचं सरकार वादविवादात सुरू आहे, असं रामदास आठवले म्हणाले. ते साताऱ्यात पत्रकार परिषदेत बोलत होते.
दरम्यान, सध्या आमच्याकडे 117 आमदार आहेत. त्यामुळे राज्यात भाजपची सत्ता कधीही येऊ शकते, असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
IPL चौदावा हंगामाचे वेळापत्रक जाहीर ; ‘या’ दोन संघात होणार पहिला सामना
ज्येष्ठ रंगकर्मी आणि अभिनेते श्रीकांत मोघे काळाच्या पडद्याआड
“उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात स्वखर्चाने एखादी बालवाडी तरी चालू करून दाखवावी”
“स्लिप मास्टर रहाणे! काही इंचांनी चेंडू मैदानाला लागू न देता अजिंक्यचा भन्नाट झेल”