Home महाराष्ट्र मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना भाजपने विचारले ‘हे’ चार प्रश्न!

मारहाण प्रकरणी जितेंद्र आव्हाडांना भाजपने विचारले ‘हे’ चार प्रश्न!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात अभियंत्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप होत आहे. त्यावरून कालपासून बरीच चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपने जितेंद्र आव्हाड यांना 4 प्रश्न विचारले आहेत.

1) तरूणाच्या घरी जे गणवेशधारी पोलिस गेले होते ते त्या तरूणाला खोटं बोलून मंत्री महोदयांच्या खासगी बंगल्यावर का घेऊन गेले? तर तरूणाच्या म्हणण्यानुसार बंगल्यावर 10 ते 15 इसम पूर्वीच उपस्थित होते. म्हणजे कोरोना लॉकडाऊनचे नियम स्वतः महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या आशीर्वादानेच धाब्यावर बसवले जात आहेत का?.

2) पोलिसांच्या उपस्थितीत मंत्र्यांच्या बंगल्यावर लोकांना मारहाण होत असेल तर महाराष्ट्रात गुंडगीरीला शासन-प्रशासन अभय देत आहे का?

3) त्या तरूणाने मंत्री महोदयांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट लिहिली असेल तर त्यावर कायदेशीर कारवाई व्हावीच पण त्याची वाट न बघता गृहनिर्माण मंत्र्यांचे समर्थक म्हणवणाऱ्यांनी कायदा हातात घेणे सोयीचे समजले.

4) महाराष्ट्राच्या मंत्र्यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा महाराष्ट्राच्या गृहखात्यावर आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? असे चार सवाल भाजपने जितेंद्र आव्हाड यांना विचारले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

मारहण प्रकरणावर जितेंद्र आव्हाडांनी अखेर सोडलं मौन, म्हणाले…

जितेंद्र आव्हाडांना मंत्रिमंडळातून तत्काळ बडतर्फ करा; देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

बंगल्यावर नेऊन अभियंत्याला बेदम मारहाण; जितेंद्र आव्हाडांवर आरोप

तुमच्या सर्व निर्णयांना आमचा पाठिंबा; देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र