मुंबई : सचिन वाझे यांच्या लेटर बॉम्बमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. सचिन वाझे यांनी लिहिलेल्या पत्रात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह परिवहनमंत्री अनिल परब यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कडवट आणि खरा शिवसैनिक दुसरं काहीही करेल पण तो बाळासाहेब ठाकरे यांची खोटी शपथ कधीची घेणार नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी अनिल परब यांची पाठराखण केली. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
राज्यातील विरोधक केंद्रीय तपास यंत्रणांसाठी लाल गालिचे अंथरत आहेत. ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे. इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्र काय देशाच्या इतिहासात घडलं नाही. मात्र, महाराष्ट्रातील सरकारला अशाप्रकारे कोंडीत पकडण्याचे विरोधकांचे डावपेच यशस्वी होणार नाहीत. ठाकरे सरकारच्या केसालाही धक्का लागणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊतांनी यावेळी केला.
महत्वाच्या घडामोडी –
…म्हणजे सचिन वाझेंचं पत्र भाजप कार्यालयातूनच आलं असावं- हसन मुश्रीफ
“गिरणी कामगार नेते दत्ता ईसवलकर यांचं निधन”
” ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी लागतील, सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही”
बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, माझ्यावरील आरोप खोटे आहेत- अनिल परब