आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
बीड : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी उभा केलेला परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
या निवडणुकीत राजकारण बाजूला ठेवत भाजप नेत्या पंकजा गोपीनाथराव मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे हे दोघे बहिण-भाऊ एकत्र आल्याचं पहायला मिळालं. यानंतर पंकजा मुंडेंनी माध्यमांशी संवाद साधला.
ही बातमी पण वाचा : “ओडिशामध्ये द बर्निंग ट्रेनचा थरार, कोरोमंडल एक्सप्रेस, मालगाडीला धडकली, 50 जणांचा मृत्यू, तर 179 जखमी”
गोपीनाथराव मुंडे साहेबांनी मोठया कष्टातून आणि मेहनतीने वैद्यनाथ साखर कारखान्याची उभारणी केली. पण गेल्या काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती व अन्य कारणांमुळे कारखाना आर्थिक अडचणीचा सामना करत आहे. आताच्या या परिस्थितीत कारखान्याला अडचणीतून बाहेर काढून त्याचे हित पाहणे महत्त्वाचे होते म्हणून आम्ही बिनविरोध निवडीचा निर्णय घेतला., असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
दरम्यान, राजकारण न आणता कारखान्याचं हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही व धनंजय मुंडे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे चांगला व सकारात्मक पायंडा यातून पडेल, असा विश्वास पंकजा मुंडेंनी यावेळी व्यक्त केला.
महत्त्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठं काहीतरी शिजतंय; शरद पवारांच्या भेटीनंतर आता आशिष शेलार ‘वर्षा’वर दाखल
“मोठी बातमी! शरद पवार, अचानक मुख्यमंत्री शिंदेच्या भेटीसाठी ‘वर्षा’वर, चर्चांना उधाण”